Customer Testimonials

“Every feedback is a feather in our growing cap, motivating us to perform better ! “

Customer service is not just a day in or a day out ongoing but a never ending, unremitting, persevering, compassionate, type of activity that encourages us to believe in the best. Through their feedback, we strive to make every important aspect of the customer experience a little bit better and worthier! 

"मुलांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे हे सॉफ्टवेअर आहे यामुळे मुलांची प्रगती तर होईलच त्याचबरोबर मराठी शाळेत मुलांची पटसंख्या देखील वाढण्यास मदत होईल."

श्री. नंदकुमार थवई - जिल्हा परिषद शाळा, भाल, पेण.

"संगणक हाताळायचे अधिक ज्ञान नसतानाही मी आमच्या शाळेत बसवलेले गुरुजीवर्ल्ड टेक्नॉलॉजीचे जीक्लास सॉफ्टवेअर हाताळायला सुरुवात केली. सदरचे सॉफ्टवेअर हाताळायला मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळी मला यात काहीच अडचण आली नाही. तसेच याआधी आम्ही जे दुसऱ्या कंपनीचे ई-लर्निंग सॉफ्टवेअर वापरले होते त्यापेक्षा खूप चांगले असे हे सॉफ्टवेअर आहे व याचा फायदा मुलांना तसेच शिक्षक सक्षम होण्यासाठी होणार आहे. धन्यवाद.”

श्रीमती. विजयश्री नारायण म्हात्रे - कान्होबा शाळा, पेण.

"आमच्या भागातील काही शाळेत गुरुजीवर्ल्ड टेक्नॉलॉजी या कंपनीने ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर दिले असून, मुलांना तसेच शिक्षकांना त्याचा अतिशय चांगला फायदा होताना दिसून येत आहे. गुरुजीवर्ल्डने दिलेले जीक्लास सॉफ्टवेअर कसे हाताळायचे तसेच हे त्यांच्या प्रतिनिधींनी आमच्या शिक्षकांना समजावून सांगितले आहे त्यामुळे शिक्षकही उत्साह दाखवून मुलांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिकवत आहेत. तसेच जीक्लास सॉफ्टवेअर मध्ये अत्यंत महत्वाची अशी वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे मुलांच्या आकलनात अधिक भर पडेल याची खात्री आहे."

के.डी. चवरकर - केंद्र प्रमुख, वढाव, पेण

"घरच्या परिस्थितीमुळे आमच्या मुलांना मोठ्या शाळेमध्ये घालणं होत नाही, त्यामुळे एक पालक म्हणून मनाला सारखी खंत लागून राहते परंतु सरकारी शाळांमध्येही आमच्या मुलांना ई-लर्निंग सारखी सुविधा मिळाल्याने मुलांच्या गुणवत्तेत नक्कीच भर पडेल तसेच मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल व त्याचा परिणाम मुलांचे आकलन सहज होण्यास मदतीचे ठरेल."

- पि.सी.एम.सी. छत्रपती शाहूमहाराज विद्यामंदिर मुले/मुली प्रायमरी स्कूल कासारवाडी शाळेतील पालक.

"गुरुजीवर्ल्ड च्या कंपनीने जे ई-लर्निंग सॉफ्टवेअर आमच्या शाळेला दिलेले आहे त्याच्या उपयोगाने आमच्या शाळेतील इयत्ता ५ वी 'क' च्या वर्गातील मुलांचा स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल १००% लागला असून ५ विद्यार्थ्यांना १८० गुणांपर्यंत मार्क मिळाले आहेत. तरी मी गुरुजीवर्ल्ड कंपनीचा आभारी आहे"

श्री. विनायक खरे - इयत्ता ५ वी स्कॉलरशिप शिक्षक, पोवई डॉकयार्ड म्युनिसिपल इंग्लिश मिडीअम स्कूल, मुंबई.