छत्रपती शाहूमहाराज विद्यामंदिर मुले/मुली प्रायमरी स्कूल कासारवाडी- पालकसभा

गुरुजीवर्ल्ड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने CSR Partner “जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे” यांच्या सहयोगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ५ शाळांमध्ये १ली ते १० वी मराठी व सेमी इंग्लिश माध्यमासाठी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून Interactive ई-लर्निंग GKlass App व Audio-visual Klassroom दिले आहेत. त्यामधील पि.सी.एम.सी. छत्रपती शाहूमहाराज विद्यामंदिर मुले/मुली प्रायमरी स्कूल कासारवाडी या शाळेत दिनांक १९ जुलै २०१८ रोजी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जवळपास ५० पालकांचा सहभाग होता. तसेच गुरुजीवर्ल्ड टेक्नॉलॉजीज CSR team च्या नेहा महाडिक आणि स्वाती सुमन हे टीचर ट्रेनर्स सदरच्या पालकसभेसाठी उपस्थित होते. या पालकसभेमध्ये शाळेचे शिक्षक श्री. गिड्डे सर यांनी उपस्थित पालकांना GKlass ई-लर्निंग App ची थोडक्यात माहिती दिली तसेच गुरुजीवर्ल्ड टेक्नॉलॉजीज CSR team च्या नेहा महाडिक यांनी उपस्थित पालकांना डिजिटल एज्युकेशनचे महत्व आणि त्याचा मुलांना होणारा फायदा, तसेच मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग किती परिणामकारक ठरतो याबद्दल मार्गदर्शन केले.

 

पालकांना मार्गदर्शन करताना गुरुजीवर्ल्ड टेक्नॉलॉजीज CSR team च्या नेहा महाडिक.

 

GKlass ई-लर्निंग App ची थोडक्यात माहिती देताना शाळेतील शिक्षक श्री. गिड्डे सर.

 

पालकसभेत पालकांना मार्गदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कोळंबे मॅडम.

 

admin
No Comments

Post a Comment