
गुरुजीवर्ल्ड आणि पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ‘जीक्लास ऍप’ विनाशुल्क.
नुकत्याच पोलीस फ्रेंड्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या द्वितीय वर्धापन सोहळ्याचे औचित्य साधून गुरुजीवर्ल्ड टेक्नोलॉजी प्रा. लि. यांच्याकडून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष (२०१९-२०) साठी ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत ‘जीक्लास ऍप’ विनाशुल्क उपलब्ध करून देण्याची घोषणा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गिरीश प्रभू यांनी व्यासपीठावरून केली. पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष निखील येवले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये पार पडलेल्या या सोहळ्यानिमित्त गुरुजीवर्ल्डचे मा. गिरीश प्रभू(मुख्य कार्यकारी अधिकारी), मा. आनंद जिरगे, स्वाती सुमन, स्नेह घिल्डीयाल, सुरज कांबळे, निलेश जगताप आणि निता खेडकर उपस्थित होते.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देताना मा. गिरीश प्रभू म्हणाले की ‘सद रक्षणाय, खल निग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला आयुष्याचं ध्येय मानलेल्या पोलीस दलातील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. या दलातील कर्मचारी पालक देखील आहेत, हे आम्ही जाणतो. त्यामुळे इतरांप्रमाणे आपल्या मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता देखील सतावत असणार. म्हणूनच खास पोलिसांच्या मुलांसाठी आम्ही ‘जीक्लास’ ई-लर्निंग ऍपचा हा उपक्रम घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे पालक म्हणून आपली मुलांच्या अभ्यासाबाबतची चिंता नक्कीच कमी होणार आहे”.
जीक्लास ऍपच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते म्हणाले कि ‘जीक्लास’ या शैक्षणिक ऍपद्वारे आपल्या पाल्याला त्याच्या इयत्तेनुसार सर्व विषयांचा पालकांच्या नजरेसमोर घरात बसून अभ्यास करणे सोपे आहे. सर्व विषयाच्या धड्यांचे
अॅनिमेशनच्या सहाय्याने केलेले व्हिडीओ मुलांमध्ये अभ्यासाबाबत रुची निर्माण करण्यास सहाय्यक ठरणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर दिलेल्या चाचणीमुळे मुलांना विषय कितपत समजला याचे मूल्यमापन देखील होणार आहे. सर्व क्षमतांच्या मुलांसाठी उपयोगी असणारे हे ऍप मुलांचे अभ्यासातील डिजिटल मित्र असल्याचेदेखील ते म्हणाले.
खास पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी जीक्लास ई-लर्निंग ऍपचा हा उपक्रम या शैक्षणिक वर्षासाठी कोणतेही शुल्क न आकारता गुगल प्ले स्टोर (Google play store ) वर ‘GKlass e-Learning App’ या नावाने उपलब्ध असल्याने यावेळी सभागृहातील मान्यवरांनी आणि इतर उपस्थितांनी कंपनीकडून लावलेल्या स्टॉलजवळ येऊन उपक्रमाची माहिती घेतली. तसेच बहुतांश पालकांच्या मोबाईलमध्ये देखील हे ऍप डाउनलोड करून देण्यात आले.
गुरुजीवर्ल्ड टेक्नोलॉजीज प्रा.लि. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गिरीश प्रभू व्यासपीठावरून जीक्लास ई-लर्निंग उपक्रमाची घोषणा करताना.
गुरुजीवर्ल्ड कंपनीचे निलेश जगताप आणि सुरज कांबळे हे पोलीस दलातील पालकांच्या मोबाईललमध्ये जीक्लास ऍप इंस्टॉल करून देताना.