We are an Ed-tech company focusing on 200m underserved tier2-tier3 and rurban students studying in state board & vernacular schools. Our digital e-learning app – GKlass is a hybrid and adaptive learning app comprising of simplified interactive learning videos and content in vernacular, Marathi and English in line with K-10 school & board curriculum. Read More..
App डाऊनलोड केले शिक्षक. पालक विद्यार्थी यांच्यासाठी हे app खूप फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांना याचा सरावासाठी व नविन गोष्टी शिकण्यास खूप फायदा होईल. धन्यवाद! सर!
आता शिकणे झाले सोपे! शिक्षक, पालक व सध्यस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अॅप आहे. सुंदर चित्र, सुस्पष्ट आवाज, आशय परिपूर्ण माहिती दिली आहे. स्वाध्याय सोडवून दिला आहे. अनेक गोष्टींनी परिपूर्ण. सर्वांनी करावा असे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा दोस्त. धन्यवाद प्रभू सर! आदर्श केंद्रप्रमुख श्री. प्रताप मेमाणे साहेब आपलेही मनापासून धन्यवाद!
सन्माननीय गिरीशजी, मी इंग्रजी व भूगोल विषय शिकवत असल्याने आज आपल्या GKlass app मधील काही धडे बारकाईने अभ्यासले. तसेच गणित व विज्ञान शिकवणाऱ्या माझ्या काही शिक्षक मित्राशी app बाबत चर्चा केली. आमच्या सर्वांच्या मते आपण सर्वच विषयांची अतिशय सुंदर निर्मिती केली आहे. थोडक्यात पण अतिशय महत्वाचे भाग आपण अतिशय परिणामकारकतेने निर्माण केले आहेत. प्रत्येक ठिकाणी तो तो भाग आकृत्या, प्रयोगाच्या साहाय्याने समजावून देण्यात आला आहे. सुस्पष्ट व सुरेल आवाज , योग्य चित्रे, यथायोग्य विश्लेषण, पाठानंतरचे अभ्यास, भाषा विषयमधील व्याकरण, लेखन कौशल्य व सर्वच भाग अतिशय योग्यरीत्या तयार केलेला आहे. मला खात्री आहे विद्यार्थ्यांना आपला अभ्यास खूप आवडेल व आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल. आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या द्वारे महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहचाल. आपल्या या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!
GKlass app मुळे मला गणित, विज्ञान व इतर विषय खूप सोप्या पद्धतीने समजतात. GKlass app वर मी गणित, विज्ञान व इंग्रजी हे विषय शिकतो. व ते खूप सोप्या पद्धतीने शिकवतात त्यामुळे समजायला अतिशय सोपे जाते. दिवसात साधारण मी 3तास ही app वापरतो. पाठानंतर दिलेल्या चाचण्या मी सोडवतो. त्यामुळे मी पाठात काय शिकलो ते समजते. GKlass मधील शिकवणे मला खूप आवडले. GKlass app मुळे मला शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासाचा जास्त तणाव जाणवणार नाही. असे मला वाटते. जो पाठ मला समजला नाही तो मी GKlass app वर व्हिडिओद्वारे अगदी सोप्या पद्धतीने शिकलो . ही app अभ्यासात खूप मदत करणारी आहे. असा मी सर्वांना निरोप देईल.
प्रत्येक पाठाचे चित्रांच्या माध्यमातून मोजक्या शब्दात विश्लेषण खुपच छान आहे प्रत्येक घटकावर उत्तरासहीत स्वाध्याय सोडवुन दिला आहे . त्यामुळे मुलांना उत्तरे कशी असावी. ती कशी मुद्देसुद लिहावीत हेही समजते. आकर्षक चित्रे आणि सोपी भाषा यामुळे मुलांना शिकवलेला घटक लगेच समजेल. खरोखरच शिक्षक. विद्यार्थी.पालक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अॅप आहे. धन्यवाद सर!